TOD Marathi

टिओडी मराठी, वॉशिंग्टन, दि. 15 जुलै 2021 – आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता विविध शस्त्रे तयार केली जात आहेत. आणि हि शस्त्रे मनुष्य नव्हे तर मशीनच घेऊन जाणार आहे. त्यामुळे हल्ल्यातील होणारी मनुष्यहानी देखील वाचणार आहे. या तंत्राकडे अनेक देशांनी लक्ष दिलं आहे. बलाढ्य अमेरिकेच्या संरक्षण खात्यातील संशोधकांनी एक आगळा-वेगळा असा उडणारा ग्रेनेड तयार केला आहे. तो शत्रूच्या प्रदेशात करेल आणि ज्यावेळी या ग्रेनेडने प्रवेश केला आहे, असे समजताच रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने स्फोट घडविणे शक्‍य होणार आहे.अर्थात याला ड्रोन बॉम्ब असे म्हणत आहेत.

या ग्रेनेड ला एखादा हेलिकॉप्टरप्रमाणे पंख लावले आहेत. हा ग्रेनेड 20 किलोमीटर अंतरापर्यंत उडू शकतो. सर्वसाधारणपणे असणाऱ्या ग्रेनेडचा वापर करताना सैनिक त्याची पिन काढून तो फेकतात आणि नंतर त्याचा स्फोट होतो. पण, सध्या संशोधकांनी शोधलेल्या या वेगळ्या उडणाऱ्या ग्रेनेडमुळे भविष्यात युद्धाची परिभाषा बदलली जात आहेत.

या ग्रेनेडला चार पाती असून त्यांच्या वेगामुळे तो नियोजित ठिकाणी जाईल. जर नियोजित ठिकाणी स्फोट घडवून आणणे शक्य झाले नाही तर हा ग्रेनेड पुन्हा एकदा मूळ ठिकाणी परत येईल.

ही सर्व कामे रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने करता येतात. अमेरिकेचा लष्कराने नॉर्थ कॅरोलिनाच्या एका कॅम्पमध्ये मागील आठवड्यात या ग्रेनेड ची यशस्वी चाचणी केली आहे. हा प्रकारचा ड्रोन बॉम्ब असून त्याचा आकार खूप लहान आहे.

ड्रोनच्या सहाय्याने जेव्हा स्फोट घडवला जातो. तेव्हा ड्रोन तो बॉम्ब वाहून नेत असतो. नंतर बॉम्ब टाकला जातो, त्यानंतर त्याचा स्फोट होतो. पण, या ठिकाणी मात्र ग्रेनेडचा स्फोट रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने केला जाणार आहे. या वेगळ्या ग्रेनेडला ड्रोन फोर्टी असे नाव दिल आहे.

अशा प्रकारचा ग्रेनेड बनवण्याची कल्पना ऑस्ट्रेलियाच्या लष्कराची असून इराकमध्ये तैनात असलेल्या ऑस्ट्रेलियन सैनिकांना नेहमी दूरवर मारा करण्याबाबत समस्या येत होत्या. त्यावेळेस त्यांच्या डोक्यात अशा प्रकारच्या ग्रेनेडचा शोध लावण्याचा विचार मनात आला. आणि तो आता प्रत्यक्षात आला आहे.