टिओडी मराठी, दि. 1 ऑगस्ट 2021 – अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्यात चकमकी सुरू असताना कंदाहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला आहे. शनिवारी रात्री तीन रॉकेटने हल्ले केलेत. यात एक विमानतळावर तर दोन हवाई पट्ट्यांवर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व विमान उड्डाण रद्द केली आहेत. विमानतळ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अफगाणिस्तान देशातून अमेरिकेने लष्कर मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर तालिबानने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. तालिबानकडून अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या भागांवर कब्जा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यातून मोठा संघर्ष निर्माण झालाय.
अमेरिकन लष्कर माघारी फिरल्यानंतर अफगाणिस्तानामध्ये पुन्हा तालिबान संकट उभं राहिलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या घोषणेपासून तालिबानने अफगाणमधील विविध भागांवर आक्रमण केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील ८५ भागांवर कब्जा मिळवला आहेत, असा दावा तालिबाननं केला होता.
याअगोदर कंदाहार हेच तालिबानचे मुख्यालय होतं. त्यामुळे उत्तर अफगाणिस्तानसह कंदाहारमधील परिस्थिती आता बिघडली आहे. त्यातच आता कंदाहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला आहे. तीन रॉकेट विमानतळाच्या दिशेनं सोडण्यात आलेत.
यात एक विमानतळाला धडकलं, तर दोन विमानाच्या हवाई पट्ट्यांवर पडली आहेत. त्यामुळे रनवेचे नुकसान झालंआहे. सर्व विमान सेवा रद्द केली आहे. यापूर्वी ७ एप्रिल २०२१ रोजीही कंदाहार विमानतळावर तालिबानकडून हल्ला केला होता.
मॉस्कोमधील तालिबानी शिष्टमंडळाने अफगाणिस्तानच्या ३९८ जिल्ह्यांपैकी २५० जिल्हे ताब्यात घेतले आहेत, असे म्हणत आहेत.
पुलित्झर पारितोषिक विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांची अफगाणिस्तानात गोळीबारात हत्या केली आणि त्यानंतर तालिबानने त्यांच्या मृतदेहाचीही विटंबना केली. त्यांची ओळख पटवल्यानंतर तालिबानने हे निर्घृण कृत्य केल्याचे अमेरिकेतील एका नियतकालिकात वृत्त प्रकाशित करून सांगितले आहे.
सिद्दीकी हे अफगाणिस्तानमधील संघर्ष टिपण्यासाठी गेले होते. कंदहार शहराच्या स्पिन बोल्दाक भागामध्ये अफगाणी फौजा आणि तालिबान यांच्यातील संघर्षाचे छायाचित्रण करताना त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, तालिबान्यांनी त्यांची भारतीय आहे, हे कळाल्यानंतर त्यांची हत्या करून मृतदेहाची विटंबना केली आहे.
Rockets hit Kandahar airport in Afghanistan, airport official: AFP pic.twitter.com/sRtxK5Rm0t
— ANI (@ANI) August 1, 2021