TOD Marathi

वेळ पडल्यास Shivsena Bhavan फोडू, असं वक्तव्य करणाऱ्या BJP चे MLA प्रसाद लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी ; म्हणाले, वक्तव्याचा केला विपर्यास

टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 ऑगस्ट 2021 – शिवसेनेच्या शिवसेना भवनाबाबत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेले वक्तव्य व्हायरल झालं. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यु टर्न घेत याच सगळं खापर प्रसारमाध्यमांवर फोडले आहे. असे कोणतंही वक्तव्य आपण केलं नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे प्रसाद लाड म्हणाले आहेत.

याबाबतीतले त्यांचे वक्तव्य शनिवारी रात्री व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर रात्री उशिरा प्रसाद लाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. तसेच, आपल्या वक्तव्यामुळे कुणाचे मन दुखावले असेल, तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, असे लाड म्हणाले आहेत.

रात्री उशिरा आपल्या फेसबुक अकाउंटवरून याविषयीचे स्पष्टीकरण भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिलं आहे. माझ्या एका भाषणाचा प्रसारमाध्यमांतून विपर्यास करून मी शिवसेना भवन फोडणार, अशा बातम्या आढळत आहेत. पण, मी याबाबत स्पष्टीकरण देऊ इच्छितो, घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.

जेव्हा आरे ला.. कारे होईल, तेव्हा कारेला आरेचे उत्तर दिलं जाईल. पण, ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. शिवसेना प्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबद्दल माझ्याकडून तरी असे कोणतेही वक्तव्य केले जाणार नाही, असे ते म्हणाले आहेत.

प्रसाद लाड यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. लाड म्हणाले, जर मी कुणाचे मन दुखावले असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण, यासोबत, आपल्या व्हिडीओत घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचे उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

https://www.facebook.com/479450732105032/videos/898774764317019

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज