TOD Marathi

पंडित प्रल्हाद कांबळेंची राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या राज्यप्रमुखपदी नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाची बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईच्या प्रदेश कार्यालात बैठक पार पडली.
यावेळी च्या प्रमुख उपस्थितीत श्री. पंडित प्रल्हाद कांबळे यांची पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या ‘राज्यप्रमुख’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कांबळेंचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीचं योगदान बघता पक्षानं त्यांच्यावर मोठी जबाबदार सोपवली आहे.
दरम्यान, यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. जयदेवराव गायकवाड, माजी आमदार व कोषाध्यक्ष मा. हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस मा. रवींद्र पवार, लक्षण कांबळे, सचिन तावरे, शशिकांत तापकीर, संजय गायकवाड, रविभाऊ खिलारे, हूजूर इमानदार तसेच जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष यांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.