TOD Marathi

शिर्डी येथील साई संस्थानाला (Shirdi Saibaba Trust) दर वर्षी लाखो भक्तांची गर्दी असते व त्यामुळे दररोज भक्तांकडून दान स्वरूपात पैसे दिले जातात. संस्थानच्या विविध धर्मादाय उपक्रमांमध्ये गोष्टीमध्ये ते पैसे वापरले जातात.  शिर्डी येथील साई संस्थानाच्या दानपेटीमधून मिळणाऱ्या पैश्याला, आयकर विभागाने उत्पन्न असल्याचे म्हटले होते. त्यामुळे दानपेटीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून ३० टक्के कर आयकर विभागाकडून आकारण्यात आला होता, यामुळे त्यांनी कोर्टात आपील केली. यानंतर आयकर विभागानेच ही देणगी करमुक्त असल्याचे जाहीर केले. (Trust’s Donation got relief from Income Tax) यामुळे साई संस्थानाला जवळपास पावने दोनशे कोटींची कर सवलत मिळाली.

संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितले की, (CEO of Shirdi Saibaba Trust Bhagyashri Banayat) यापुढे दानपेटीतून मिळणारी सर्व रक्कम करमुक्त असणार आहे. यामुळे दरवर्षी साई संस्थानाला जवळपास १०० कोटींचा फायदा होणार आहे. सन २०१५-१६ ला करनिर्धारण करताना आयकर विभागाने साई संस्थानाला धार्मिक ट्रस्ट नसून, धर्मोदय ट्रस्ट असे गृहीत धरले होते. यामुळे गेल्या २ वर्षांचा कर देखील आकारण्यात आला. साई संस्थानाला १८३ कोटी रूपयांचा कर भरण्यासाठीची नोटीस आयकर विभागातर्फे डिसेंबर २०१९ ला देण्यात आली. यावर संस्थानाचे तत्कालीन सीईओ कान्हुराज बराटे यांनी या मुद्यावर उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

शिर्डी येथे दररोज मोठ्या प्रमाणात साई भक्तांची गर्दी होत असते आणि इथे आलेले साईभक्त विविध माध्यमातून दान देत असतात. वर्षभरात गुरुपौर्णिमा उत्सव आणि अन्य काही महत्त्वाच्या दिवशी तर शिर्डीमध्ये लाखो भक्तांची गर्दी होत असते. महाराष्ट्रासह देश विदेशातून साईभक्त शिर्डीत येत असतात.