TOD Marathi

अजित गट बाहेर पडल्यानंतर त्यांच्यामध्ये टिकाटिप्पणी सुरुच आहे. सुरुवातीच्या काळात शरद पवार यांच्याविरोधात सौम्य भूमिका घेतली जात होती. मात्र अजित पवार गटाच्या सभेत अजित पवारांनी शरद पवार यांच्यासोबत आव्हाडांवर देखील टिका केली होती. शिवाय पत्रकार परिषदेत त्यांनी आव्हाडांवर वैयक्तिक टीका केली

अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख करत अजित पवारांनी टीका केली. जितेंद्र आव्हांडांचं पोट पावसात भिजल्यावर कसं दिसतं, अशी मिश्कील टीका अजित पवारांनी केली होती. यावर आता आव्हाडांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

आव्हाडांनी ट्विटमध्ये लिहलं आहे.दादा तुम्ही माझ्यावर वयक्तिक बोलला नसतात तर …मी तर आपल्या विरोधात एक शब्द काढला नव्हता मग माझ्या वर दर वेळेस वयक्तिक टीका कश्या साठी? शिवाय खाली त्यांचच एक ट्विट टाकत त्यासोबत पवारांचा फोटो टाकत टीका केली.

दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन 6 pack abs केले असतील पण हा पर्वाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो.. haha..त्यामुळे आता अजित पवार गट आणि शरद पवार गटातील वाद वैयक्तिक टिकांपर्यंत पोहचल्याचं पहायला मिळतयं