TOD Marathi

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र (Prime Minister Narendra) मोदींच्या हस्ते 11 डिसेंबरला होणार आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या फेजच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत (Prime Minister Narendra Modi is coming to Maharashtra to inaugurate the first phase of Balasaheb Thackeray Samriddhi Highway). पंतप्रधानांच्या या दौऱ्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाच्या पहिल्या फेजचा पाहणी दौरा केला. (Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis are on an inspection tour of the first phase today). मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सकाळी नागपूर येथे आगमन झालं, त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी एकत्र या दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास करत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य हे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत होते. प्रचंड मोठा फौजफाटा या एकूण दौऱ्यामध्ये होता.

देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जाणारा ‘बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग’ या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. (PM Narendra Modi to inaugurate phase 1 of Balasaheb Thackeray Samruddhi Highway on 11th December ) या पार्श्वभूमीवर नागपूर ते शिर्डी दरम्यान झालेल्या फेज वनची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. ही पाहणी आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. (DCM Devendra Fadnavis shared a video after observing the highway) ‘युही चला…’ हे हिंदी गाणं देखील या व्हिडिओला जोडलेलं आहे. आता केवळ पाहणी केल्यानंतर पाहणी झाल्याचा मेसेज देणारा हा व्हिडिओ आहे की राजकारणात आणखी कोणाला काय संदेश देणारा हा व्हिडिओ आहे याची चर्चा देखील होऊ लागली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केलेला व्हिडीओ बघा…