TOD Marathi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे सभा सुरू आहे. सभेच्या सुरुवातीलाच शिंदे गटासह भाजपवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार? असं म्हणत भारतीय जनता पक्षावर बोचरी टीका केली आहे. भावना गवळी या शिवसेनेच्या खासदार आहेत, शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्या शिंदे गटात दाखल झाल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी त्यांनी बांधली होती, तो फोटो देखील व्हायरल झाला होता. त्यावर बोलत असताना ताईंनी मोदींना राखी बांधली आणि ईडीवाले गप्प बसले असं सांगत ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ हेही आपल्याला माहिती आहे, असं म्हणत खासदार भावना गवळी यांचा देखील नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली.

याच सभेमध्ये आमदार नितीन देशमुख, कैलास पाटील यांचा आपल्याला अभिमान आहे. कापले तरी विकले जाणार नाही असे हे निष्ठावान आहेत असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं त्यांचं कौतुक केलं आहे.