TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 15 जुलै 2021 – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा फटका बसला आहे. आता दुसरी लाट ओसरत आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट केलं आहे. प्रत्येक राज्यात कमी-जास्त प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळत आहेत. तर दुसरीकडे रुग्णसंख्येत घट होत आहे. मात्र, करोना नियंत्रणाबद्दल उत्तर प्रदेशची कामगिरी उत्तम आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ‘योगी आदित्यनाथ यांची पाठ थोपटली आहे.

आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, करोनाशी सामना करण्यासाठीचे उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. मी काशीमधल्या माझ्या सहकाऱ्यांचे, शासन- प्रशासनाचे, करोना योद्ध्यांच्या संपूर्ण गटाचे विशेष आभार मानतोय. तुम्ही ज्याप्रमाणे दिवस-रात्र झटून व्यवस्था निर्माण केली आहे, ही मोठी सेवा आहे. काशीसहित संपूर्ण उत्तरप्रदेशने या संकटाशी खंबीरपणे लढा दिला.

उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी यांची स्तुती केली आहे. असे म्हंटले जात आहे. देशात उत्तर प्रदेश हे मोठं राज्य आहे. त्यामुळे याकडे अनेक पक्षाचं लक्ष लागलं आहे.