TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 15 जुलै 2021 – राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. यात पूर्ण मदत कारेन, असे आश्वासनही त्यांना मिळालं आहे.

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या चुका दाखवून टीका करत असतात. तर, सत्ताधारी विरोधकांचे आरोप खोडून काढत असतात. सत्ताधारी व विरोधकांत आरोप – प्रत्यारोपाचा हा सिलसिला सुरू असतो. मात्र, आज एक वेगळे चित्र पहायला मिळाले.

मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी सकाळी भेट घेतली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांची ही भेट झाली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यास संदर्भात दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. मंत्री छगन भुजबळांसोबत माजी खासदार समीर भुजबळ ही होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले, मी या प्रश्नात संपूर्ण मदत करीन. हा प्रश्न राज्यातच सुटण्यासारखा आहे. त्यामुळे तीच भूमिका जाणून घेण्यासाठी छगन भुजबळ यांनी आज भेट घेतलीय. केंद्राकडे जाण्याचा विषय चर्चेत आलेला नाही.

छगन भुजबळांनी केली होती विनंती :
देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच संपूर्ण श्रेय घ्यावं. पण, ओबीसी आरक्षणाचा डाटा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, ही माझी विनंती आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

5 वर्षे भाजप सरकारच्या हातात ओबीसी विषय होता. मात्र, काहीही तुम्ही केलं नाही. भाजप सरकारने डाटा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, केंद्र सरकारने डाटा दिलेला नाही आणि आता तुम्ही म्हणताय 4 महिन्यांमध्ये करता, असं म्हणत छगन भुजबळांनी फडणवीसांना टोला हाणला होता.