शाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील; भुजबळांची टीका!

Chhagan Bhujbal - TOD Marathi

बीड: शाहरुख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील, अशी जोरदार टीका राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. छगन भुजबळ पहिल्यांदाच बीडमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते. त्यांनी भाजपवर चांगलीच टोलेबाजी केली आहे.

यावेळी त्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात राहावं लागलेल्या दिवसांच्या आठवणींना उजळा दिला. मी बांधलेल्या महाराष्ट्र सदनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मिटिंग घेत होते. या घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर आरोप झाले. आमच्या घरावर १७ वेळी धाडी पडल्या. धाडी पडल्या की आमच्या पत्नी, मुले घाबरून मॉलमध्ये जाऊन बसायचे. तो काळच विचित्र होता, असे सांगत त्यांनी त्यांच्या त्यावेळच्या कटू आठवणींना देखील उजाळा दिला.

निवडणुका जवळ आल्या की भाजपचे ओबीसी प्रेम जागे होते. मात्र ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भाजपाचेच लोक कोर्टात जातात, अशी टीका त्यांनी भाजपवर यावेळी बोलताना केली आहे. त्याच सोबत बीडमध्ये आल्यानंतर जनतेने जे प्रेम मला दाखवलं त्यामुळे मी भारावून गेलो असल्याचे सांगत बीडकरांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

Please follow and like us: