देशात कोरोना असताना नरेंद्र मोदी सरकारने 93 देशांना लस विकल्या- भाई जगताप, काँग्रेस आंदोलन करणार

टिओडी मराठी, दि. 25 मे 2021 – देशात कोरोना असतानाही त्यावेळी लसीकरण मोहीम राबविण्याऐवजी भारतातील तयार झालेल्या लसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 93 देशांना विकल्या आहेत. त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील लोकांच्या लसीकरणावर मोठा परिणाम झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या या कृतीबद्दल जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्या वतीने मुंबईतील लसीकरणाच्या केंद्राबाहेर आंदोलन करणार आहे, अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी नुकतीच केली.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या विरोधातील या आंदोलनाची सुरुवात उत्तर मुंबईतून होणार आहे.

सकाळी दहा ते अकरा यावेळेत काँग्रसचे कार्यकर्ते मुंबईत 36 विधानसभा क्षेत्रामध्ये मार्केट किंवा लसीकरणाच्या ठिकाणी मानवी साखळी करतील. मास्क, अंतर राखून साखळी करतील.

‘मोदीजी हमारी बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यो भेज दिया हैI ‘ हे पोस्टर्स कार्यकर्त्यांच्या हातात असणार आहेत. प्रत्येक दिवशी सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये अशा प्रकारे सहा दिवस आंदोलन सुरू राहणार आहे, असेही मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले आहे.

Please follow and like us: