TOD Marathi

PNB Scam Case : हिरे व्यापारी मेहुल चोक्सी ‘तेथूनही’ पळाला!; कुटुंबीय चिंतेत, वकील विजय अग्रवाल यांची माहिती

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 25 मे 2021 – पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावणारा हिरे व्यापारी मेहुल चोक्सी एटिंग्वा-बारबुडा येथून पळाला आहे. मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी याला दुजोरा दिलाय. याबाबत मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी सांगितले की, मला चोक्सीच्या परिवाराने भेटण्यासाठी बोलावले होते. चोक्सी पळाला झाला असून कुटुंबीय चिंतेत आहेत.

हिरे व्यापारी मेहुल चोक्सी देशात लपून बसला होता, त्या एटिंग्वा-बारबुडाच्या पंतप्रधानांनी त्याचे नागरिकत्व रद्द केले होते. तसेच त्याला हिंदुस्थानच्या हवाली करणार आहे, असे सांगितले होते.

याबाबत पंतप्रधान गॅस्तन ब्राऊन यांनी याची माहिती दिली होती. पंतप्रधान गॅस्तन ब्राऊन म्हणाले, ‘आम्ही कोणत्याही गुन्हेगाराला आमच्या देशामध्ये आश्रय देणार नाही. हिंदुस्थान व आमच्यात झालेल्या कराराचे पालन करत आहोत. मेहुल चोक्सीची चौकशी सुरू आहे.

चौकशी संपल्यावर त्याला हिंदुस्थानच्या हवाली केले जाईल. पीएनबी घोटाळय़ानंतर मेहुल चोक्सी एटिंग्वात पळला होता आणि तेथील नागरिकत्व घेतले होते. आता एटिंग्वातील न्यायालयात जुलै महिन्यामध्ये मेहुल चोक्सीबाबत सुनावणी होणार होती.