TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 24 मे 2021 – एसबीआय बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खातेधारकांसाठी नवे सर्व्हिस चार्ज १ जुलै २०२१ पासून लागू करणार आहेत. यात एटीएममधून पैसे काढणं, चेकबुक, ट्रान्सफर यावर नवे दर लागू होणार आहेत.

एसबीआयने बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खात्यांत किमान रक्कम ही शून्य ठेवण्याची आणि कमाल रक्कम ठेवण्याची कोणतीही मर्यादा ठेवलेली नाही. एसबीआय बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खात्यासह ग्राहकांना रुपे एटीएम कम डेबिट कार्डही मिळत आहे.

चार मोफत ट्रान्झॅक्शननंतर आता बँक शुल्क आकारण्यात येणार आहे. यात ब्रान्च आणि एटीएम दोन्हीवर शुल्क आकारले जाईल. एका महिन्यात चार वेळा मोफत ट्रान्झॅक्शनची मर्यादा संपल्यानंतर पुढील ट्रान्झॅक्शनपासून ग्राहकांकडून शुल्क आकारले जाईल.

त्यानंतरच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर ग्राहकांना १५ रूपये आणि जीएसटी असं शुल्क द्यावे लागेल. चार मोफत ट्रान्झॅक्शन्सनंतर सर्वच एटीएम व ब्रान्च ट्रान्झॅक्शनवर शुल्क आकारले जाईल, असे स्टेट बँकेकडून सांगितले आहे.

चेकबुकसाठी असे आहे शुल्क:
एसबीआय बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खातेधारकांसाठी एका वर्षात १० चेक लिफ मोफत देणार आहे. त्यानंतर १० लीफच्या एका चेकबुकसाठी ४० रूपये आणि जीएसटी असं शुल्क आकारले जाईल.

२५ लीफच्या चेकबुकसाठी ७५ रूपये आणि जीएसटी, याशिवाय १० लिफच्या इमरजन्सी चेकबुकसाठी ५० रूपये आणि जीएसटी असं शुल्क आकारले जाणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवरील शुल्कात सूट दिली आहे.