TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 8 मे 2021 : कोरोनामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन तर, काही ठिकाणी संचारबंदी आदी उपाययोजना राबविल्या जात आहेत. अशा परिरिस्थित नागरिकांना घरी राहा, सुरक्षित रहा, असा सल्ला दिला जात आहे. पण, बँकेसह इतर कामे कशी करणार? असाही प्रश्न अशावेळी उद्धभवत असतो. त्यामुळं कोरोना संकट काळामध्ये भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस सर्व्हिसची सुरूवात केलीय. आता ग्राहक घरीच बसून फोनवरून सुद्धा बँकेशी संबंधित अनेक कामे करता येणार आहेत. SBI चे सुमारे 44 कोटीहून अधिक ग्राहक सौं त्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

SBI चा हा आहे. टोल फ्री नंबर :
SBI ने ग्राहकांसाठी टोल फ्री नंबर जारी केलाय. बँकेने ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे की, “घरीच राहा, सुरक्षित राहा… आम्ही तुमची सेवा करण्यासाठी इथे आहोत. SBI आपल्याला एक कॉन्टॅक्टलेस सेवा देत आहे, जी तुमच्या तात्काळ बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे. SBI च्या टोल फ्री नंबर 1800 112 211 किंवा 1800 425 3800 वर कॉल करा. ”

या मिळतील सुविधा :
SBI ने ट्विटसह एक व्हिडिओ सुद्धा जारी केलाय. त्यात म्हटले आहे की, या नंबरवर कॉल करून ग्राहक कोण-कोणत्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. व्हिडिओनुसार, अकाऊंट बॅलन्स व शेवटचे 5 ट्रान्जक्शन, एटीएमला बंद किंवा चालू करणे, एटीएम पिन किंवा पिन जेनेरेट करणे, नवीन एटीएमसाठी अप्लाय करण्यासाठी या टोल फ्री नंबरवर ग्राहक कॉल करू शकतात.