TOD Marathi

‘या’ महिन्यात असा मिळावा स्वस्तात LPG गॅस सिलेंडर; जाणून घ्या, ‘हि’ Offer

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 11 जून 2021 – एलपीजी गॅस सिलेंडरच्या ग्राहकांसाठी पेटीएमने एक बंपर ऑफर आणलीय. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 800 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. याबाबत भारत पेट्रोलियमनेहि माहिती दिली आहे. जाणून घ्या काय आहे ऑफर?

पेट्रोल- डिझेल घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती पेट्रोल-डिझेलच्या किंमतींप्रमाणे वाढत आहेत. मात्र, या महिन्यात तुमच्याकडे स्वस्त दरात गॅस सिलेंडर खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये थेट 800 रुपयांपर्यंतची बचत करता येणार आहे.

ही एक कॅशबॅक ऑफर असून पेटीएम ग्राहकांना 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर देत आहे. ही ऑफर पहिल्यांदा बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे. पहिल्यांदा एखाद्या ग्राहकाने App च्या माध्यमातून ‘भारत गॅस’ बुक केला तर, त्याला 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. भारत पेट्रोलियमने देखील या ऑफरबाबत ट्वीट करत माहिती दिलीय.

अशा प्रकारे करा ऑफर बुक? :
– तुमच्या मोबाइलमध्ये पेटीएम अॅप नसेल तर सर्वात आधी पेटीएम App डाउनलोड करावे.
– पेटीएम अॅपमध्ये recharge and pay bills’ मध्ये जावे.
– त्यानंतर ‘book a cylinder’ (बुक ए सिलेंडर) असा पर्याय निवडावा.
– याठिकाणी तुम्हारा ‘भारत गॅस प्रोव्हायडर’ म्हणून निवडावा.
– त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक किंवा तुमचा एलपीजी आयडी दाखल करावा.
– यानंतर QR Code स्कॅन करून या ऑफरचा लाभ घ्यावा.