TOD Marathi

Wanted कोविशील्ड लस घेतलेला पती;, वाचा ‘हि’ Viral जाहिरात, जाणून घ्या सत्य

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 11 जून 2021 – आपण वधू पाहिजे, वर पाहिजे अशा जाहिराती वाचल्या असतील आणि पहिल्या असतील. अपेक्षेनुसार आपला जोडीदार निवडला जातो. यात आता काळानुसार बदल झाला आहे, एका तरुणीने कोविशील्ड लस घेतलेला पती पाहिजे, अशी जाहिरात एका इंग्रजी दैनिकात दिली आहे. सध्या ती जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही ही जाहिरात शेअर केली आहे. आणि हे न्यू नॉर्मल आहे का? असे म्हटले आहे. मात्र, हि जाहिरात खोटी आहे.

सध्या जगामध्ये कोरोनान थैमान घातलं आहे. अनेक देशांनी लसीकरण करून कोरोना आटोक्यात आणला आहे. हिंदुस्थानातही कोविशील्ड व कोवॅक्सीन या दोन कोरोना प्रतिबंधक लस दिल्या जाताहेत. तसेच रशियन स्पुटनिक लस व अँटीबॉडी कॉकटेलचा उपयोग सुरू आहे.

24 वर्षीय रोमन कॅथलिक मुलीला एक पती पाहिजे, मुलीचे शिक्षण एमएससी झाले आहे. मुलगा स्वजातीतला असावा व त्याने कोविशील्ड लस घेतलेली असावी, अशी अट या जाहिरातीमध्ये दिली आहे. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झालीय. पण, ही जाहिरात खोटी आहे, असे समोर आले आहे.

फ़ॅक्ट चेक करणार्‍या एका ‘आल्ट न्यूज’ या वेबसाईटने याबाबत वृत्त दिलंय. Fodey.com या वेबसाईटवरून हे वृत्त संपादित केलं आहे. गोव्याच्या सॅवियो फिगुरेडो या व्यक्तीने सर्वप्रथम हे वृत्त सोशल मीडियावर अपलोड केलं होतं.

कोरोना लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी हे वृत्त आपण तयार केले आहे, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच ही जाहिरात इतकी व्हायरल होईल, असे वाटले नव्हते असेही त्यांनी सांगितले आहे.