TOD Marathi

जाणून घ्या, जर एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास ‘त्यांच्या’ Aadhaar, PAN, Passport चे काय करावे?

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 11 जून 2021 – सध्या कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कागदपत्रांचे काय करावे? असा प्रश्न पडतो. जर घरातील एका व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या Aadhaar, PAN, Passport चे काय करावे? याबाबत आपण जाणून घेऊया.

PAN Card, Aadhaar Card, Voter ID card, Passport, Driving License ही सारी सरकारी ओळखपत्रे आहेत जी उपयोगी पडतात. एखाद्याचा मृत्यू नंतर त्या कार्डांचे काय होते?. मृत व्यक्तीच्या वारसाला याची काही कल्पना असते कि नसते? केव्हापर्यंत हि कागदपत्र सोबत ठेवायची? की सरकारकडे जमा करायची ? असा प्रश्न पडतो.

Aadhaar Card : आधार नंबर ओळख, पत्ता आणि विविध योजनांच्या वापरासाठी कामाला येत आहे. मात्र, व्यक्तीच्या मृत्यूनंतर या आधार कार्डचा गैरवापर न होण्याची काळजी वारसांनी घ्यावी लागते.. UIDAI कडे हे आधारकार्ड रद्द करण्याची किंवा त्यावर मृत अशी नोंद करण्याची कोणतीही सोय नाही, असे काही सल्लागार सांगतात.

Voter ID Card : मतदान ओळखपत्राचे तसे नाही. निवडणूक आयोगाकडे फॉर्म नंबर 7 भरून मयत व्यक्तीचे ओळखपत्र रद्द करण्याची सोय केली आहे. यासाठी स्थानिक कार्यालयामध्ये मृत्यूपत्राची प्रत द्यावी लागणार आहे.

PAN Card : पॅन कार्डचा वापर बँका, आयकर भरण्य़ासाठी वापरले जाते. मृताचा आयकर देखील त्या वर्षासाठी भरता येतो. हे खाते बंद होत नाही तोवर पॅन कार्ड आवश्यक आहे. आयकर विभाग जोवर भरलेला रिटर्न प्रोसेस करत नाही, तोवर हे पॅन कार्ड चालू ठेवावे. यानंतर बँक खाते वगैरे बंद करून हे पॅन कार्ड आयकर विभागाकडे सरेंडर करावे.

Passport : आधार कार्ड प्रमाणे पासपोर्टमध्येही सरेंडर किंवा रद्द करण्याची सोय नाही. एकदा का पासपोर्टची व्हॅलिडिटी संपली की तो आपोआप रद्द होतो. हा पासपोर्ट मृत्यूनंतर वारसाने ठेवणे काही अंशी योग्य नाही.