TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 25 मे 2021 – फेसबुक अकाउंट क्लोनिंग करून पैसे मागून फसवणूक करण्याचा अज्ञाताचा प्रकार ‘सायबर’कडून हाणून पाडला आहे. तसेच असे अकाउंट ब्लॉक करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. असा प्रकार पुणे पोलीस दलात घडल्याचे समोर आले आहे. तसेच पोलिसांनी देखील अशा अकाउंटवर कुणीही पैसे पाठवू नये, असे आवाहन केले आहे.

अज्ञाताने पुणे शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे बनावट फेसबुक अकाउंट बनविले आणि त्या अकाउंटद्वारे अजूनही पैसे मागत आहे. हा प्रकार समोर येताच सायबर पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ हे अकाउंट ब्लॉक केले आहे. तसेच हे अकाउंट बनावट असून, कोणीही पैसे भरू नये, असे आवाहन केले आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर येथील पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातोय. पिंपरी पोलीस दलामध्येही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने खाते तयार करुन पैसे मागण्याचे प्रकार समोर आले होते.

आता असे प्रकार पुणे पोलीस दलात होऊ लागले आहेत. शहर पोलीस दलामध्ये प्रशासनाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या नावाने अज्ञाताने फेसबुक अकाउंट तयार केले आहे.

‘त्या’ अज्ञाताने अनेकांना Friend Request पाठवल्या होत्या. त्या फ्रेंड Request स्वीकारल्यानंतर त्यांना पैसे मागणी करत होता, असे लक्षात आले. हा प्रकार समोर आल्यानंतर ही माहिती सुपेकर यांना समजताच त्यांनी सायबर पोलिसांना सांगितली आणि ते फेसबुक अकाउंट ब्लॉक करण्यास सांगितले.

तसेच त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून ही माहिती प्रसारित करून मित्र परिवार आणि नागरिकांना आवाहन केले आहे.