TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 31 जुलै 2021 – सध्या पुणे पोलीस दलामध्ये पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या आयपीएस प्रियंका नारनवरे यांची फुकट बिर्याणीची ऑर्डर देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. या क्लिपमुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली असून आता पोलीस दलातील कोल्ड वॉर समोर आलं आहे. त्यामुळे यातून वसुलीला चाप बसला होता, म्हणून माझ्याविरुद्ध अशी क्लिप केली आहे, असा आरोप आयपीएस प्रियंका नारनवरे यांनी केला आहे. त्यामुळे पुण्यात देखील पोलिसांकडून वसुली होते का ? असा प्रश्न पडत आहे.

फुकट बिर्याणी मागण्याचा आरोप झालेल्या आयपीएस प्रियंका नारनवरे यांनी प्रसारमाध्यमांकडे खुलासा केला आहे, यात त्यांनी आरोप केलाय. प्रियंका नारनवरे यांनी म्हटलं आहे की, त्यांच्याविरोधात फुकट बिर्याणीची ऑडिओ क्लिप बाहेर आलीय. एका षड्यंत्राचा भाग आहे. वसुली करणारा कॅट मोडून काढल्यामुळे दुखावलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हा प्रकार घडवून आणला आहे.

यात त्यांच्या जागी अगोदर असलेल्या डीसीपी यांचे हितसंबंध आहेत, त्यामुळे हा प्रकार घडविला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. नारनवरे यांच्या खुलाशानंतर पुणे पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेलं कोल्ड वॉर आता समोर आलंय.

एक आयपीएस अधिकारी पुणे पोलिसांकडून होणाऱ्या वसुलीची कबुली देत आहे. त्यावर पुण्याचे पोलीस आयुक्त गप्प आहेत. यावरून पुण्यात खरंच वसुली होते का? असा प्रश्न पडत आहे.

फुकट बिर्याणीच्या आरोप ज्या आधिकार्‍यांवर झाले आहेत, त्या आयपीएस प्रियंका नारनवरे यांच्याशी आम्ही बोललो. तेव्हा त्यांनी हे आपल्या विरोधातील षड्यंत्र आहे, असा दावा केलाय. हे षड्यंत्र दुसरे तिसरे कुणी नाही तर पुणे पोलीस दलातील एक डीसीपी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी केला आहे, असा दावाही त्यांनी केलाय.

या ऑडिओ क्लिपने अगोदरच पुणे पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली होती, आता अधिकारी यांच्या मधल्या राजकारणातून हे घडलं आहे. त्यामुळे प्रियंका नारनवरे यासंदर्भात अधिकृत तक्रार देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एवढं सगळं होऊनही पुण्याचे पोलीस आयुक्त गप्प का आहेत?. पोलिसांमध्ये खरंच राजकारण होत आहे का? असा प्रश्नही या निमित्ताने पडत आहे.