टिओडी मराठी, दि. 30 जून 2021 – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारने आज विद्यार्थ्यांसाठी केलीय. त्यांच्या सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट क्रेडिट कार्ड सुरू केले असून या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साधारण वार्षिक व्याज दरावर 10 लाख रुपयांपर्यंत आता कर्ज घेता येणार आहे.
तृणमूल काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्टुडंट क्रेडिट कार्ड योजनेला मंजुरी दिल्याची माहिती दिलीय. बंगालमधील विद्यार्थ्यांसाठी आज क्रेडिट कार्ड सुरू केले आहे, असं ममता घोषणा करताना म्हणाल्यात.
पश्चिम बंगालमधील तरुणांनी स्वावलंबी होण्यासाठी या योजनेत साधारण वार्षिक व्याज दरावर 10 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज भारत किंवा परदेशात पदवीधर, पदव्युत्तर, डॉक्टरेट आणि पोस्ट-डॉक्टरेटच्या अभ्यासासाठी उपलब्ध असणार आहे.
याची सर्वात महत्वाची बाब म्हणजे नोकरी मिळाल्यानंतर विद्यार्थ्याला हे कर्ज परत करण्यासाठी 15 वर्षांचा वेळ दिला जाणार आहे. बॅनर्जींची ही घोषणा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
More Stories
‘अग्निपथ’साठी लवकरच राबवली जाणार भरती प्रक्रिया
सुशीलकुमार शिंदे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत? दिल्लीत महत्वाची बैठक
वरुण गांधींचा भाजपला घरचा आहेर; ‘या’ विषयावर केले भाष्य