TOD Marathi

भारताची Covaxin लस Alpha, Delta व्हेरिएंटवरही प्रभावी ; अमेरिकेच्या National Institutes of Health चा दाखला

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, वॉशिंग्टन, दि. 30 जून 2021 – भारताची कोव्हॅक्‍सिन लस ‘अल्फा’ आणि ‘डेल्टा’ व्हेरिएंटवरही प्रभावी आहे, सा दाखला अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेने दिलाय. ही लस डेल्टा आणि अल्फा विषाणूंचाही प्रभावी मुकाबला करू शकते, असेही या संस्थेने म्हटले आहे.

भारत बायोटेकने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या मदतीने तयार केलेली कोव्हॅक्‍सिन ही करोनावरील लस या रोगाच्या अल्फा आणि डेल्टा जातीच्या विषाणूवरही प्रभावी ठरत आहे.

ज्यांनी कोव्हॅक्‍सिनची लस घेतली आहे त्यांच्या रक्‍ताची तपासणी करून संस्थेने हा निष्कर्ष काढलाय. त्यांनी म्हटले आहे की, ही लस त्वरेने अँटिबॉडी तयार करते. तसेच त्यातून अल्फा आणि डेल्टा विषाणूंचा नायनाट करते. हे विषाणू अनुक्रमे पहिल्यांदा ब्रिटन व भारतात सापडलेत.

कोव्हॅक्‍सिन लसींचे डोस आतापर्यंत भारतासह अन्य देशांतील एकूण 2.5 कोटी लोकांनी घेतली आहे. ही लस पूर्ण सुरक्षित व प्रभावी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. या लसीच्या दोन टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष या अगोदरच प्रकाशित झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष अजून जाहीर झालेले नसले तरी या चाचण्यांचा जी प्राथमिक माहिती उपलब्ध झालीय, त्यानुसार ही लस करोनाच्या कोणत्याही विषाणूवर 78 टक्के प्रभावी ठरत आहे.

अत्यंत गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना ही लस शंभर टक्के प्रभावी ठरते, असे त्यांनी म्हटले आहे. असिम्टीमॅटिक रुग्णांमध्ये ही लस 70 टक्के प्रमाणात प्रभावी ठरत आहे.