TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 30 जून 2021 – सध्या राज्यात करोना काळातही आंदोलन सुरू आहेत, दुसऱ्या लाटेतील समस्यांतून आपण काही शिकलो नाही, हेच दुर्दैव आहे, असे मत हायकोर्टाने व्यक्त केलं आहे. तसेच आरक्षणाच्या मुद्यावरुन देखील आंदोलने सुरू आहेत. आरक्षणाचा मुद्दा तर न्यायप्रविष्ट आहे, तरी या मुद्यांचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी सध्याच्या परिस्थितीचा थोडा विचार करायला हवा, असे खडेबोल न्यायालयाने सुनाविले आहेत.

याप्रकरणी स्नेहा मरजादी यांनी ऍड. अर्शिल शहा यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलीय. या याचिकांवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी झाली.

कोरोना दरम्यानच्या विविध समस्यांबाबत हायकोर्टामध्ये सुरू आहेत. तसेच नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी झालेले आंदोलन आदी विविध विषयाबाबत न्यायालयाने विविध प्रश्‍न उपस्थित केले.

तसेच सरकारला हे थांबवणे शक्‍य नसेल तर आम्हाला कठोर निर्णय द्यावा लागेल, असे म्हणत न्यायालयाने राज्यात सुरू असलेल्या आंदोलनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच शुक्रवारी होणाऱ्या पुढील सुनावणीमध्ये निकाली निघालेल्या समस्या व सध्याच्या समस्या याची तक्‍त्यानुसार माहिती सादर करण्याचे निर्देश देत सर्व याचिकांवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली आहे.