TOD Marathi

सरकारी पॅनलने Serum ला दिला झटका ; कोवोव्हॅक्सला नाकारली परवानगी, कोणत्याच देशाने मुलांच्या ‘या’ लसला दिली नाही परवानगी

टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 जुलै 2021 – सरकारी पॅनेलने सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाला मोठा झटका दिला आहे. सरकारी पॅनेलने सीरम इंस्टिट्यूटला 2 ते 17 वयाच्या मुलांसाठी कोवोव्हॅक्सच्या लसच्या चाचणीची परवानगी देण्यास नकार दिलाय.

सीरम इंस्टिट्यूटने सोमवारी ड्रग कंट्रोलर ऑफ जनरल ऑफ इंडियाकडे अर्ज केला होता. या अर्जात त्यांनी 10 ठिकाणच्या 920 लहान मुलांवर कॉव्होव्हॅक्सची ट्रायल चाचणीसाठी परवानगी मागितली होती. हि मागणी सरकारी पॅनेलने नाकारली आहे.

मात्र, भारताच्या औषध नियंत्रक मंडळाच्या सरकारी पॅनेलने कोवोव्हॅक्सच्या चाचण्यांना परवानगी दिली नाही. ह्या लसला अजून कोणत्याही देशाने लहान मुलांसाठी मान्यता दिलेली नाही, त्यामुळे सीरमला देखील परवानगी कशी देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील आठवड्यापासून कोरोनावरील ‘कोवोव्हॅक्स’ लसींचं उत्पादन सुरु झालंय. भारतात कोवोव्हॅक्स लसला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुख्य म्हणजे कोवोव्हॅक्स ही लस दक्षिण आफ्रिका तसेच ब्रिटिश व्हेरिएंटवर प्रभावी आहे, असं दिसलं आहे.तर, सप्टेंबर 2020 मध्ये नोवाव्हॅक्सने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता.

कोवोव्हॅक्स लसला मान्यता मिळाली असती तर ती मुलांवर ट्रायल चाचणी होणारी तिसरी लस ठरली असती. याअगोदर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि जाइडस कॅडिलाच्या ZyCov-D या लसींच्या मुलांवर चाचण्या सुरू केल्या आहेत.

सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया या कंपनीचे असे म्हणणे आहे कि, कोवोव्हॅक्सच्या डोसनंतर जर एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला तर लसीपासून तयार केलेले अँटीबॉडीज त्याच्या स्पाइक प्रोटीनला लॉक करतील. हे विषाणू पेशींत प्रवेश करण्यापासून रोखू शकतील व त्या व्यक्तीस संसर्ग होणार नाही.