TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 13 ऑगस्ट 2021 – पुणे शहरावर करोनाचे सावट कायम असल्याने यंदाचा गणेशोत्सवही साधेपणाने साजरा केला जाणार आहेत. तसेच ऑनलाइन दर्शनावर भर देत सामाजिक उपक्रम राबवित साजरा केला जाणार आहे. मिरवणुका काढण्यात येणार नाही, अशी भूमिका गणेशोत्सव मंडळांनी घेतलीय. पुणे महापालिकेमध्ये गणेश मंडळाच्या बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्‍त विक्रम कुमार, पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर यांच्यासह विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

करोनामुळे दोन वर्षांयामध्ये सर्वच गोष्टींवर बंधने आलीत. आजही करोनाबाबत जनजगृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंडळांना झिरो बजेट कार्यक्रम द्यावेत. तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी लसीकरण, करोना नियम याबाबत समाजप्रबोधन कार्यक्रमाची परवानगी द्यावी, अशी भूमिका गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मांडली आहे.

पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतलेल्या निर्णयाचे महापालिकेकडून स्वागत केलं जात आहे. गणेश मंडळांना उत्सवात कोणतीही अडचण येणार नाही. 2019 ला जे परवाने दिले होते. तेच यंदा चालणार आहेत.

कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून योग्य नियोजन केलं जाणार आहे.

पुणे शहरातील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळा, मैदाने आणि मोकळ्या जागेत पाण्याचे हौद बांधण्यात येणार आहेत. फिरत्या हौदांची संख्या वाढवणार आहे.

करोनामुळे उत्सव साजरा करीत असताना शहरात स्वच्छता राखणेही महत्त्वाचे ठरणार आहे. याकरिता पालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात येत असली तरी यात गणेश मंडळांचे सहकार्य मोठे ठरणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

पुणे शहरायामध्ये अजूनही करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसाला 200 पर्यंत रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मंडळानींही समाजभान ठेवून उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन आयुक्‍त विक्रम कुमार यांनी केलं आहे.