TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 13 ऑगस्ट 2021 – करोना प्रतिबंधक लसीचे शुक्रवारी (दि. १३) ‘कोव्हॅक्‍सीन’ आणि ‘कोविशिल्ड’ दोन्ही लस उपलब्ध करून देणार आहेत. दोन्ही मिळून 193 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. याशिवाय प्रत्येक केंद्रांवर कोविशिल्डचे डोस वाढवले आहेत. आता एका केंद्रावर 200 जणांना लस मिळणार आहे. कोविशिल्ड लस ही 187 केंद्रांवर तर कोव्हॅक्‍सीन ही लस 6 केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. कोव्हॅक्‍सीनचे प्रत्येक केंद्रांवर 500 तर कोविशिल्डचे 200 डोस उपलब्ध असणार आहेत.

18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशिल्डचा जो पहिला डोस मिळणार असून त्यातील 20 टक्‍के लस ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्‍केलस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळणार आहे.

तर कोव्हॅक्‍सीनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्‍के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्‍के ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळणार आहे.

21 मेपूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना शुक्रवारी 30 टक्‍के लस ऑनलाइन बुकिंग करून, तर 30 टक्‍केऑन दि स्पॉट दुसरा डोस दिला जाणार आहे.

तर 15 जुलैला कोव्हॅक्‍सीनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना शुक्रवारी 40 टक्‍के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर 20 टक्‍केलस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळणार आहे.