TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 13 ऑगस्ट 2021 – सध्या पेट्रोल -डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना काळातच पेट्रोल -डिझेलने शंभरी गाठली आहे. त्यामुळे याला पर्याय शोधला जात आहे. त्यामुळे एलपीजी ऐवजी सीएनजीचा अधिक प्रमाणात वापर केला जात आहे. सध्या देशामधील गुजरात राज्यात सर्वाधिक सीएनजी स्टेशन अधिक आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

सीएनजीचा वापर वाढवण्यसाठी केंद्र सरकार पावले उचलली आहेत. त्यानुसार देशात अनेक ठिकाणी सीएनजी स्टेशनची संख्या वाढवण्यात येतेय.

देशात सर्वाधिक सीएनजी स्टेशन्सची संख्या गुजरात राज्यात आहेत. देशातील एकूण सीएनजी स्टेशनपैकी 25 टक्के सीएनजी स्टेशन गुजरात राज्यामध्ये आहेत.

सीएनजीचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून सध्या देशामध्ये 3 हजार 94 सीएनजी स्टेशन्स आहेत. पुढील 10 वर्षात 8 हजारहून अधिक स्टेशन्स उभारले जातील, असा सरकारचा मानस आहे.

सध्या देशात सर्वाधिक सीएनजी स्टेशन्स गुजरात राज्यामध्ये असून त्यांची संख्या 779 इतकी आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात 488, उत्तर प्रदेशमध्ये 485, तर राजधानी दिल्लीत 436 सीएनजी स्टेशन्स आहेत.