TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 8 जुलै 2021 – देशातील गेल (इंडिया) लिमिटेडने विविध विभागातील पद भरती करणार आहे. या विभागातील एकूण २२० जागांवर अर्ज मागविले आहेत. यात इंजिनिअर, वकील, मार्केटिंग, एचआर आदी पदे भरणार आहेत. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हि सुवर्णसंधी आहे.

गेलद्वारे बुधवारी, ७ जुलै २०२१ नोकर भरतीबाबत नोटिफिकेशन काढले आहे. यानुसार मेकॅनिकल, मार्केटिंग, एरआर, सिव्हिल, कायदे, राजभाषा आदी विभागांवर मॅनेजर, सिनिअर इंजिनिअर, सिनिअर ऑफिसर आणि ऑफिसर पदांसाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

इच्छुक उमेदवार गेल (इंडिया) लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईट www.gailonline.com ला भेट देऊन नोकरीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची मुदत बुधवारपासून सुरु झाली आहे.

शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२१ आहे. यासाठी उमेदवारांना २०० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क अर्ज करताना ऑनलाईन भरायचे आहे. यामध्ये एससी, एसटी आणि दिव्यांग या वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.

या पदांसाठी होणार भरती :
मॅनेजर (मार्केटिंग-कमोडिटी रिस्क मॅनेजमेंट): 4 पद
मॅनेजर (मार्केटिंग इंटरनॅशनल एलएनजी आणि शिपिंग): 6 पदे
सीनियर इंजीनियर (केमिकल): 7 पदे
सीनियर इंजीनियर (मेकॅनिकल): 51 पदे
सीनियर इंजीनियर (इलेक्ट्रिकल): 26 पदे
सीनियर इंजीनियर (इंस्ट्रुमेंटेशन): 3 पदे
सीनियर इंजीनियर (सिविल): 15 पदे
सीनियर इंजीनियर (गेलटेल टीसी/टीएम): 10 पदे
सीनियर इंजीनियर (बॉयलर ऑपरेशन): 5 पदे
सीनियर इंजीनियर (पर्यावरण इंजीनियरिंग): 5 पदे
सीनियर ऑफिसर (ईअँडपी): 3 पदे
सीनियर ऑफिसर (एफ अँड एस): 10 पदे
सीनियर ऑफिसर (सी अँड पी): 10 पदे
सीनियर ऑफिसर (बीआयएस): 9 पदे
सीनियर ऑफिसर (मार्केटिंग): 8 पदे
सीनियर ऑफिसर (एचआर): 18 पदे
सीनियर ऑफिसर (कॉर्पोरेट कम्युनिकेशन): 2 पदे
सीनियर ऑफिसर (लॉ): 4 पदे
सीनियर ऑफिसर (एफ अँड ए): 5 पदे
ऑफिसर (प्रयोगशाळा): 10 पदे
ऑफिसर (सिक्युरिटी): 5 पदे
ऑफिसर (राजभाषा): 4 पदे

GAIL Recruitment 2021 भरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी https://www.gailonline.com/CRApplyingGail.html इथे क्लिक करा.

GAIL Recruitment 2021 अर्ज करण्यासाठी  https://careers.gail.co.in/sap/bc/webdynpro/sap/ywerec_005_home_page/# इथे क्लिक करा.