TOD Marathi

टिओडी मराठी, नागपूर, दि. 2 सप्टेंबर 2021 – नागपूर येथील महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरमध्ये इंजिनिअर्ससाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली असून सीनियर आरएस आणि जीआयएस सहाय्यक या पदांच्या सुमारे 29 जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीची दिनांक 06 सप्टेंबर 2021 अशी आहे.

भरतीची पदे –

  1. सीनियर आरएस
  2. जीआयएस सहाय्यक

आवश्यक पात्रता आणि अनुभव –

  • सीनियर आरएस (Senior RS) – सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा इंजिनिअरिंगची पदवी आवश्यक आहे.
  • जीआयएस सहाय्यक (GIS Assistant) – CIVIL इंजिनिअरिंगची पदवी आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता पुढीलप्रमाणे –

MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर -440010, राज्य महाराष्ट्र.

मुलाखतीची दिनांक – 06 सप्टेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mrsac.gov.in/MRSAC/ या लिंकवर क्लिक करा.
सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.