परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह मुसळधार पावसाने (Mumbai rains) अचानक हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं होतं. मुंबईतील काही भागात गुरुवारी भर दुपारी अचानक संध्याकाळ सारखा अंधार दाटून आला. आणि अचानक काळे ढग दाटून आल्यानं विजांच्या कडकडाटासह (Rains with Lightening) जोरदार पावसाने हजेरी लावली.
दुपारी 2.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मुंबईचा उत्तर आणि दक्षिण भाग, तसंच नवी मुंबई, रायगड भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या पावसाचा मुंबईकरांच्या वेगावर जरी परिणाम झाला नसला तरी अचानक आलेल्या पावसाने सगडीकडे गोंधळ उडाल्याचे चित्र बघायला मिळाले.
दरम्यान पुढच्या काही तासांत मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय. विजांच्या कडकडाटासह मुंबईत पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.