TOD Marathi

‘या’ कार वर मिळणार जबरदस्त ऑफर ..

संबंधित बातम्या

No Post Found

आनंदाचा उत्सवाचा सण अर्थात दिवाळी. दिवाळीत प्रत्येक जण काही ना काही खरेदी करत असतो. या काळात अनेक वस्तूंवरही भरघोस सूट मिळत असते. निमित्ताने यावर्षी देखील काही कार उत्पादक कंपन्यांनी गाड्यांवर विशेष सवलत दिली आहे. नेमक्या गाड्या कोणत्या आहेत? आणि त्यांचे किमती नक्की कसे असणार आहेत? हेच आपण या लेखातून पाहणार आहोत..

 

Maruti Celerio: नवी सेलेलियो चार व्हेरिएंटमध्ये म्हणजे Lxi, Vxi, Zxi, Zxi+ मध्ये उपलब्ध आहे. बेस व्हेरिएंटची पेट्रोल प्रकाराची किंमत ४.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. एएमटीसाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. एएमटी श्रेणीची कार ५०,००० रुपये महाग आहे. टॉप एंड एएमटी व्हेरिएंट ६.९४ लाख रुपयांना मिळते आहे. यावर 59,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे.

 

Maruti Alto K10: सिझलिंग रेड, स्पीडी ब्लू आणि अर्थ गोल्ड या तीन रंगात ही कार येते. मॅन्युअल व्हेरियंटच्या किंमती 3.99 लाख रुपयांपासून सुरू होतात आणि 5.33 लाख रुपयांपर्यंत जातात, तर दोन ऑटो गियर शिफ्ट व्हेरियंटची किंमत 5.49 लाख आणि 5.83 लाख रुपये आहे. या कारवर 39,000 रुपयांची सवलत उपलब्ध आहे.

 

Maruti Swift: या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे, तर तिचे टॉप मॉडेल 8.71 लाख रुपये आहे. या कारच्या खरेदीवर 50,000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.

 

Maruti Ignis: या कारची एक्स-शोरूम किंमत 5.35 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.72 लाख रुपयांपर्यंत जाते. मारुती इग्निसच्या खरेदीवर या महिन्यात 30,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.

 

Maruti Wagon R: मारुती वॅगनआरची एक्स-शोरूम किंमत 5.48 लाख ते 7.08 लाख रुपये आहे. या कारवर 40,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे.

 

Renault Kwid: या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.64 लाख रुपये आहे जी 5.99 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारच्या खरेदीवर 35,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.

 

Renault Triber: Renault Triber MPV ची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारच्या खरेदीवर 50,000 डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे.

 

Honda City: या कारची एक्स-शोरूम किंमत 11.57 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.52 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारच्या खरेदीवर कोणीही 37,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतो.

 

TataHarrier: एक्स-शोरूम किंमत 14.70 लाख ते 22.20 लाख रुपये आणि सफारीची एक्स-शोरूम किंमत 15.35 लाख ते 23.56 लाख रुपये आहे. या कारवर ग्राहक या महिन्यात 45,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात.

 

 

Hyundai Grand i10 Nios बाजारात 5.43 लाख ते 8.45 लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. तर  या कारवर 33,000 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते.

 


Aura: ची एक्स-शोरूम किंमत 6.09 लाख ते 8.87 लाख रुपये आहे.या कारवर 34,000 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते.