TOD Marathi

छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, जावेद अख्तर, फारूख अब्दुल्ला असे सर्वपक्षीय आणि विविध क्षेत्रातील मंडळी एकाच मंचावर आहेत. (Chhagan Bhujbal 75th birthday program in Mumbai) यामध्ये बोलताना “छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते कधीच मुख्यमंत्री झाले असते.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांना सुखद धक्का दिला. (Uddhav Thackeray in Chhagan Bhujbal birthday program) आता आम्ही धक्काप्रूफ झालो आहोत असेही ते म्हणाले. मात्र, तुम्ही जे काही झालं ते बाळासाहेब असतानाच मिटवून टाकलं, असं म्हणत जी लोक अजूनही बाळासाहेबांच्या नावाने टीकाटिपणी करतात. त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. नियतीच्या मनात काय असतं, त्याची कल्पना नाही. मात्र, बाळासाहेबांचा जुना सखा सोबती पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या माध्यमातून का होईना आमच्या सोबत आले आहेत असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली. शिवसेनेच्या वतीने त्यांनी महापौर, आमदार अशा जबाबदाऱ्या देखील निभावल्या होत्या. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यांनी काँग्रेस पक्ष प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा त्यांच्यासोबत ते बाहेर पडले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पहिले प्रदेशाध्यक्षही होते. त्याच छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी देखील उपस्थित होती.