TOD Marathi

टिओडी मराठी, गडचिरोली, दि. 4 सप्टेंबर 2021 – कलेक्टर ऑफिस गडचिरोली येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. तांत्रिक अधिकारी, डेटा विश्लेषक, कृषी विशेषज्ञ, विकास विशेषज्ञ, समन्वयक, स्टेनोग्राफर हि पदे भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

भरतीची पदे –

  • तांत्रिक अधिकारी (Technical Officer)
  • डेटा विश्लेषक (Data Analyst)
  • कृषी विशेषज्ञ (Agriculture Specialist)
  • विकास विशेषज्ञ (Development Specialist)
  • समन्वयक (Coordinator)
  • स्टेनोग्राफर (Stenographer)

आवश्यक पात्रता आणि अनुभव –

  • तांत्रिक अधिकारी (Technical Officer) – संबंधित विषयात B.E./B.Tech./MCA पदवी आवश्यकआहे.
  • डेटा विश्लेषक (Data Analyst) – MCA/M.Sc. Statistics/Computer Science पदवी आवश्यक आहे.
  • कृषी विशेषज्ञ (Agriculture Specialist) – M.Sc. Agriculture/Environment/Biodiversity विकास विशेषज्ञ (Development Specialist) – B.E./B.Tech./MBA पदवी आवश्यक आहे.
  • समन्वयक (Coordinator) – Arts मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा MBA आवश्यक आहे.
  • स्टेनोग्राफर (Stenographer) – पदवीधर आणि संबंधित पदाविषयी ज्ञान आवश्यक आहे.

या पत्त्यावर पाठवा अर्ज –

आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटभेट द्या.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://gadchiroli.gov.in/ या लिंकवर क्लिक करा