TOD Marathi

रशियातील बेपत्ता विमान समुद्रात कोसळले ; 28 जणांचा मृत्यू, तुटला Air Traffic Controller

टिओडी मराठी, मॉस्को, दि. 8 जुलै 2021 – रशियातून मंगळवारी बेपत्ता झालेल्या विमानाचा नुकताच शोध लागला आहे. हे विमान डोंगराच्या टोकाला घासून समुद्रात कोसळले आहे. या अपघातात सुमारे 28 जणांचा मृत्यू झाला असून यात 22 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्सचा समावेश आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान रशियातील कामचाट्का प्रायद्वीपमधील पालना गावामध्ये उतरणार होते. पण, लँडींगपूर्वी विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलर सोबत संपर्क तुटला.

An-26 नावाचे हे विमान कामचाट्का एविएशन इटरप्राइज या कंपनीचे होते. विमानाने पेट्रोपावलोस्क-कामचाट्स्की शहरामधून उड्डाण घेतली होती.

याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, ओखोतस्कच्या समुद्रात हे विमान कोसळले असून पालना शहरापासून 10 किलोमीटर दूर असताना विमानाचे मोठ्या डोंगराला घर्षण झाले. रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिनने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत.

क्रॅश झालेले विमान ट्विन-इंजिन असलेले टर्बोप्रॉप विमान होते. हे विमान सिविलियन व मिल्ट्री ट्रांसपोर्टसाठी वापरले जात होते. या विमानाची डिजाइन आणि उत्पादन सोवियत संघात 1969 ते 1986 दरम्यान केलेले आहे.