TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 8 जुलै 2021 – दिल्लीमधील एम्समध्ये नोकरी मिळण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंजिनीअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (बेसिल) ने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स), नवी दिल्लीच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट यूनिट (पीएमयू) मध्ये कन्सल्टंट आणि सिनियर कन्सल्टंट पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिलीय. कंपनीने 2 जुलै 2021 ला जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार दोन्ही पदांच्या एकूण 5 जागा रिक्त असून या जागांवर भरती होणार आहे.

या सर्व पदांची मुदत सुरुवातीला एक वर्षाची असणार आहे. हा कालावधी उमेदवाराचे काम आणि संस्थेची गरज पाहून वाढविणार आहे. बेसिल्स एम्स भरती 2021 च्या जाहिरातीनुसार नोकरीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट becil.com वर जाऊन अर्ज करु शकतात.

उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची प्रक्रिया 2 जुलैला सुरू झाली असून 15 जुलै 2021 ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे.

इतके आहे अर्ज शुल्क :
ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
एकाहून अधिक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दुसऱ्या पदासाठी 500 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

हि पदे भरणार :
सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (हॉस्पिटल मॅनेजमेंट)
सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोजेक्ट मॅनेजमेंट)
सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोक्योरमेंट)
सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोजेक्ट फायनांशिअल मॅनेजमेंट)
सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (आयटी प्रोजेक्ट मॅनेजमेंट)

इतका मिळेल पगार :

  • कन्सल्टंट पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारास 50 हजार रुपये प्रतिमहा पगार दिला जाणार आहे.
  • सिनियर कन्सल्टंट पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारास 1 लाख रुपये प्रतिमहा पगार दिला जाणार आहे.