TOD Marathi

म्यानमार देशात Military Plane कोसळले!, 12 जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाचे बचाव कार्य सुरू

टिओडी मराठी, दि. 12 जून 2021 – म्यानमार देशात सैन्याचे एक विमान कोळलल्याची घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजले आहे. मृतांत बहुतांश सैन्य अधिकार्‍यांचा समावेश असून हा अपघात म्यानमारच्या मंडाले शहरात झालाय. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू आहे.

म्यानमारमधील मंडाले शहरामध्ये आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सैन्याचे एक विमान कोसळले. या विमानामध्ये 16 प्रवासी होती.

मंडालेच्या प्यिन ऊ ल्विन भागात हे विमान कोसळले आहे. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये बहुतांश सैन्यधिकार्‍यांचा समावेश आहे.

या अपघातामध्ये 8 जण जखमी झाले 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे असले तरी या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.