TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 12 जून 2021 – देशात पेट्रोल -डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे दुसरीकडे महागाई वाढत आहे. परिणामी सामान्यांना जगणे मुश्किल झालं आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे इंधन दरवाढ आणि महागाई यामुळे जनतेच कंबरडं मोडलं आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सामान्य जनतेचा विचार करत नाही. इंधन दरवाढ कमी करत नाही, याच्या निषेर्धात काँग्रेसने देशव्यापी निदर्शने सुरु केली आहेत. यातून काँग्रेसने नरेंद्र मोदी सरकारकडे वाढत्या किमती ताबडतोब मागे घेण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस पक्षाकडून देखील हि मागणी केली की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट ग्राहकांपर्यंत द्यावी. अनियंत्रित वाढलेली एक्ससाइज़ ड्युटी रद्द करून पेट्रोल, डिझेलला वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) आणावे.

कोरोनासाठीचे निर्बंध मागे घेतल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते, नेते शुक्रवारी देशभर रस्त्यांवर आले. एनएसयूआय, युवक काँग्रेस, महिला काँग्रेसशिवाय पक्षाचे मोठे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.

मोदी सरकारविरोधात लोकमत जागृत करण्याच्या हेतूने पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्व सहयोगी पक्षांना मोदी सरकारविरोधात मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले.

यावेळी रणदीप सुरजेवाला म्हणाले, ‘भाजप भारतीय जानलूट पार्टी बनलीयहे. सरकारी नफेखोरी, भाजपाई जिझिया टॅक्स, मोदीजी तुम्ही, आकाशातून लवकर परत या, आम्हाला जमिनीवरील प्रश्नांवर बोलायचे आहे.

तर, केंद्र सरकारने जर अबकारी शुल्क नऊ रुपयांपर्यंत कमी केले तर इंधनाच्या दरात २५ रुपये प्रति लिटर कपात होऊ शकते, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केलं आहे.

राहुल गांधी ट्विटद्वारे म्हणाले…
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले, ‘जीडीपी मरून जात आहे, बेरोज़गारी वाढत आहे, तेलाचे भाव आकाशाला स्पर्श करीत आहेत, भाजपचे ‘लुटो भारत’च्या पद्धती वेगळ्या आहेत.’

प्रियांका गांधी ट्विटद्वारे म्हणाल्या…
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्वीट करून म्हटले, कोरोना महामारीत नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलमधून वसूल केले. २.४ लाख कोटी रुपये. या पैशांतून काय मिळू शकले असते? तर पूर्ण भारताला ६७,००० कोटी लस, ७१८ जिल्ह्यांना ऑक्सिजन प्लांट, २९ राज्यांना एम्स रुग्णालये, २५ कोटी गरिबांना सहा हजार रुपयांची मदत देखील मिळाली नाही.