TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 8 ऑगस्ट 2021 – भारतीय रेल्वेने सोनीपत-जिंद या 89 किलोमीटरच्या उत्तरेकडील रेल्वेमार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांसाठी डिझेलऐवजी नवे इंधन वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या मार्गावरील रेल्वेगाड्यांसाठी हायड्रोजन इंधनाचा वापर केला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास भविष्यात भारतीय रेल्वेच्या इंधनाच्या दरात बरीच कपात होईल.

रेल्वे मंत्रालयाने दिलेली माहिती अशी, सोनीपत-जिंद मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या इंजिनमध्ये आवश्यक ते बदल केले करण्यात येतील. जेणेकरून या इंजिनांमध्ये डिझेलऐवजी हायड्रोजनचा वापर करता येणं योग्य राहील. त्यामुळे कार्बन उत्सर्जनातही मोठी घट होईल. तसेच रेल्वेच्या इंधनखर्चात दर वर्षाला 2.3 कोटींची बचत होईल, असा अंदाज आहे.

पाटणा, बरेली, आणि पाटलीपूत्र या मार्गावर 4 नव्या पॅसेंजर रेल्वे सुरु केली जाणार आहे. 7 ऑगस्टपासून ही नवी रेल्वेसेवा सुरु होणार आहे. तसेच भारतीय रेल्वेकडून तिकीट बुकिंगच्या पद्धतीतही बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशी त्यांच्या आवडीची सीट कॅटेगरी निवडू शकतील.