TOD Marathi

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 29 मे 2021 – ग्रामीण भागातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता, तसेच प्रशासनावर येणार ताण आणि रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता के. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रणजीत दादा युवा शक्ती’च्या माध्यमातून तरुणांनी एकत्र येऊन के. पी. पाटील पॉलिटेक्निक मुदाळतिट्टा (जि.कोल्हापूर) येथे मोफत जम्बो कोविड सेंटर सुरु केले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांनी या कोविड सेंटरशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील केले आहे.

हे 100 बेडचे सुसज्ज असे सेंटर सुरु केले असून उद्यापासून हे कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेत दाखल होत आहे. तसेच ज्यांना येथे रुग्णांना सेवा द्यायची असेल, यासह डॉक्टर, नर्स आदींनीही या ठिकाणी सेवा देण्यासाठी जॉईन व्हायचे असेल तर त्यांनी या सेंटरशी संपर्क साधावा, असे आवाहन गोकुळ दूध संघाचे संचालक रणजितसिंह पाटील यांनी केले आहे.

कोरोनाला हरविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन धाडसाने संघटित होऊन लढा दिला पाहिजे. तसेच या कोविड सेंटरला कोणाला मदत करण्याची असेल त्यांनी मारुती पाटील आणि महादेव पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

तसेच या सेंटरमध्ये अनेक मोफत सुविधा दिल्या जाणार आहेत. यासाठी अधिक माहितीसाठी मारुती पाटील आणि महादेव पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन ‘रणजीत दादा युवा शक्ती’च्या वतीने केले आहे.

  • जम्बो कोविड सेंटर ह्या आहेत मोफत सुविधा :
  • संपूर्ण वैद्यकीय सेवा आणि औषधं मोफत
  • जेवण आणि नाष्टा मोफत
  • रुग्णांना मानसिक आधारासाठी मोफत समुपदेशन
  • रुग्णांसाठी मोफत ग्रंथालय
  • मोफत वायफाय, टीव्हीची सोय
  • कोरोनाग्रस्त कुटुंबियांसाठी खास मोफत सुविधा
  • महिलांसाठी स्वतंत्र सुविधा