TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 29 मे 2021 – रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये; औषधांचा अतिवापर टाळावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र मेडीकल काऊन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित डॉक्टर्सना मार्गदर्शन केलं.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, काही वेळा अनावश्यकता असताना रुग्ण हॉस्पिटलमध्ये वेळेत पोहोचतो आणि काही वेळा गरज असताना रुग्ण उशीरा पोहोचतो, त्यामुळे हा आजार बळावतो आणि दगावतो, हे ओळखता यायला हवे. अनावश्यक औषधांचा अतिरेकी वापर ही टाळायला हवा. अन्यथा, रोगापेक्षा इलाज भयंकर होईल, ते होऊ नये.

आपण पावसाळ्यात अधिक काळजी घ्यायला हवी. कोविडचा रुग्ण वेळेत ओळखला पाहिजे. मुलांना कोरोना होण्याचा धोका वाढत आहे. कोणत्याही लक्षणाला दुर्लक्ष करु नये. कोरोना हा आजार अंगावर काढू नये. त्यावर वेळीच त्वरित उपचार करावेत. पावसाळ्यात अधिक खबरदारी घ्यायला हवी.

औषधांचा अनाठायी वापर टाळायला हवा. सध्या फैलावणाऱ्या बुरशी आजारावर देखील रुग्णांनुसार उपचार पद्धती निश्चित केले पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणं टाळावं, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.