TOD Marathi

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध पुकारलेल्या बंडाच्या पाचव्या दिवशी आता महत्वाच्या आणि निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. (Ekanath Shinde) राज्यात प्रचंड राजकीय उलथापालथ सुरु असताना भाजपच्या नेत्यांकडूनही त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या नव्हत्या. मात्र, पुढच्या काही तासात या सगळ्या राजकीय नाट्यामागे भाजपचा सहभाग आहे की नाही, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या सक्रिय झाले असून ते अनेकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. या भेटीगाठींबाबत मोठी गुप्तता बाळगली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी रात्री मुंबईबाहेर पडले होते. त्यानंतर आज सकाळी १० तासांनी मुंबईत परतले आहेत.

 

यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी नक्की कोणाची भेट घेतली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, भाजपकडून आजच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सागर बंगल्यावर मित्रपक्षांची बैठक बोलावली जाईल, असे सांगितले जात आहे. परंतु, भाजपकडून अद्याप या माहितीला दुजोरा मात्र देण्यात आलेला नाही.

 

देवेंद्र फडणवीस यांनी खरोखरच मित्रपक्षांच्या नेत्यांची भेट घेतल्यास ते यावेळी काय सूचना देतात, किंवा राज्यात सत्तास्थापन करण्याबाबत काही वक्तव्य करतात का, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. परंतु, आज मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. (Bjp leaders meeting) या बैठकीतही एखादा महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो.