TOD Marathi

टिओडी मराठी, लातूर, दि. 13 मे 2021 – कोरोना काळात ‘एकता प्रतिष्ठान’ने सामाजिक बांधिलकीतून आदर्शवत उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या उपक्रमांचे विविध स्तरावर कौतुक होत आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून एकता प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

‘एकता प्रतिष्ठान’ने महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. तसेच ‘एकता प्रतिष्ठान’ने कोरोना रुग्णांसाठी मानसोपचार हेल्पलाइन सेंटर सुरू केले होते.

आता कोरोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांना अल्पोपहार, अंडी पौष्टिक आहार, पाणी बॉटल आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. तसेच ‘एकता प्रतिष्ठान’ने लातूर शहरातील कोरोना सेंटर दवाखान्यात आणि परिसरात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.

यावेळी आकाश मोरे, विजय कस्पटे, वैभव पतंगे, योगेश डोंगरे, दिपक पाटील, समीर मणियार, म हेश काळे, विनोद कोलगे, विकास हलगुंडे, अभिषेक सौताडेकर, प्रशांत आदी मान्यवर उपस्थित होते. युवकांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.