TOD Marathi

Don’t Worry!; आता ‘म्युकोरमायकोसिस’वर प्रभावी ठरतोय 100 वर्षे जुना फॉर्म्युला; ‘या’ भारतीय डॉक्टरचा दावा

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, भोपाळ, दि. 13 मे 2021 – सध्या कोरोनाचं संकट जीवघेणं ठरत आहे. तर, दुसरीकडे कोरोना होऊन गेल्याना दुसरा आजार होत आहे, तो म्हणजे ब्लॅक फंगस अर्थात म्युकोरमायकोसिस होय. म्युकोरमायकोसिसमुळे चिंता आता आणखी वाढली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका डॉक्टरने यावर प्रभावी आणि अगदी किफायशीर असा उपचार केल्याचा दावा केलाय. या डॉक्टरने 100 वर्षांपेक्षा अधिक जुना फॉर्म्युला सांगितला असून हा उपाय सर्वात स्वस्त आणि अचूक आहे, असे या डॉक्टरने सांगितलं आहे. डॉ. अमरेंद्र पांडे असं या डॉक्टरांचं नाव आहे.

महाराष्ट्र राज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्येही म्युकोरमायकोसिसचे रुग्ण सापडलेत. भोपाळ, इंदोर आणि जबलपूरमध्ये हे रुग्ण सापडल्याने प्रशासनाची झोप उडालीय. हा आजार जीव घेत असल्याने त्यावर उपचारासाठी प्रयत्न सुरू झालेत. यादरम्यान मध्य प्रदेशमधील एका डॉक्टरने या आजाराला रोखण्यासाठी स्वस्त आणि सोपा असा उपाय सांगितलाय.

मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील डॉ. अमरेंद्र पांडे यांनी सांगितलं आहे कि, त्यांनी आपल्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना या उपचारामार्फत ब्लॅक फंगससारख्या भयानक आजारापासून वाचवण्याचा प्रयत्न केलाय. हा उपाय म्हणजे ‘मिथलीन ब्लू’ हा होय. डॉ. पांडे यांच्या मते, हे (मिथलीन ब्लू) औषध अँटीफंगलचे काम करतं आणि अगदी सहजपणे उपलब्ध होत आहे.

खाणीत काम करणाऱ्यांना किंवा गिर्यारोहकांना ऑक्सिजन पातळी वाढण्यासाठी हे (मिथलीन ब्लू) औषध दिलं जातं. अगदी कमी प्रमाणातही हे (मिथलीन ब्लू) औषध ऑक्सिजनची पातळी वाढवतं. सोबत अँटी फंगसचं देखील काम करतं. घरातील एक्युरियममधील माशांना फंगसपासून वाचवण्यासाठीही या औषधाचे ड्रॉप टाकले जात आहेत.

डॉ. अमरेंद्र यांनी सांगितलं कि, “प्रयोगात हे औषध प्रभावी ठरलंय. आपल्या रुग्णालयासह 12 पेक्षा अधिक रुग्णालयांनी या औषधाचा प्रयोग सुरू केलाय. ज्याचे परिणाम उत्तम आहेत. या औषधाचे केवळ दोन डोसच पुरेसे आहेत. ज्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतात. ”

“पण, या औषधाचा वापर करताना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. रुग्णांच्या शरीरात हे औषध पोहोचवणारी व्हेंटिलेटर ट्युब आणि ऑक्सिजन ट्युब वारंवार स्वच्छ करावी लागते. यामळे फंगस निर्माण होत नाही आणि रुग्ण पूर्णपणे सुरक्षित राहतो”, असे डॉ. पांडे यांनी सांगितलं आहे.