TOD Marathi

सौंदर्य स्पर्धा गाजवणाऱ्या ‘या’ तरुणीने हाती घेतले शस्त्र; म्हणाली ‘प्रतिआक्रमणाचा लढा देण्याची वेळ आलीय

संबंधित बातम्या

No Post Found

टीओडी मराठी, यंगून, दि. 13 मे 2021 – लोकशाहीची फेरस्थापना व्हावी, अशी जनतेची मागणी आहे.  यात नामवंत व्यक्तींनीही भाग घेतल्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली. या घडामोडींमुळे म्यानमार देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झालीय. म्यानमार देशात लष्करी उठावाच्या विरोधात आवाज उठवीत असलेल्या नामांकित व्यक्तींमध्ये आता एका सौंदर्यवतीची भर पडलीय. हटार हटेट असे या सौंदर्यवतीचे नाव आहे.

२०१३ मध्ये थायलंडमधील स्पर्धेत म्यानमारचे प्रतिनिधित्व केलेल्या हटारने बंदूक हातात घेत जुलुमी लष्कराला आव्हान दिले. एक फेब्रुवारी रोजी लोकनेत्या आँग सान स्यु की यांना स्थानबद्ध केल्यापासून म्यानमारमध्ये अनागोंदी माजली आहे. उठाव होऊन मंगळवारी शंभर दिवस पूर्ण झालेत. यानंतरही अनेक शहरांमध्ये आणि गावांत आंदोलन होत आहे. ते दडपण्यासाठी लष्कर बळाचा वापर होत आहे. यानंतरही सामान्य नागरीकांनी रस्त्यावर येणे थांबविलेले नाही.

हटार हटेट हिने २०१३ मध्ये थायलंडमधील पहिल्या ग्रँड इंटरनॅशनल ब्युटी पेजंटमध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये ६० देशांचे स्पर्धक सहभागी झाले होते. त्या स्पर्धेमुळे हटार हटेटला ग्लॅमर मिळाले. हटार हटेट ३२ वर्षांची असून जिम्नॅस्टीक्सची प्रशिक्षक आहे. तिने ट्विटरवर काही छायाचित्रे पोस्ट केलीत. त्यानुसार ती वांशिक बंडखोरांच्या एखाद्या गटात सहभागी झाली आहे, असे दिसते.

तिने काळ्या रंगाचा लढाऊ जवानांचा गणवेश परिधान केलाय आणि हातात बंदूक धरली आहे. त्यावरून सीमेवरील एखाद्या जंगलात ती बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेत आहे, असे स्पष्ट होते. यंदा मिस ग्रँड म्यानमार स्पर्धेत सहभागी झालेली सौंदर्यवती हान लाय हिने देखील उठावाविरुद्ध आवाज उठविला आहे. लष्कराच्या कायदेमंडळावर टीका केलीय.

जाणून घ्या, सौंदर्यवतीचे बोल
आता प्रतिआक्रमणाचा लढा देण्याची वेळ आलीय. तुम्ही शस्त्र, पेन, किबोर्ड असे जे काहीही हातात घ्या किंवा लोकशाहीवादी चळवळीला देणगी द्यावी. ही क्रांती यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने छोटासा का असेना वाटा उचललाच पाहिजे. मी शक्य तेवढी झुंज देईन, प्रत्येक गोष्टीचा त्याग करण्यास मी तयार आहे. आणि त्यासाठी सज्ज झाले आहे.

अगदी माझ्या प्राणाच्या रूपाने किंमत द्यावी लागली तरी हि त्यासाठी माझी तयारी आहे. क्युबाचे क्रांतिकारकचे गुव्हेरा यांनी म्हटल्याप्रमाणे, क्रांती ही काही पिकले फळ आपोआप जमिनीवर गळून पडते तशी होत नसते. ते फळ पिकविण्यासाठी आणि पर्यायाने पाडण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. आपल्याला जिंकलेच पाहिजे, असे हटार हटेट म्हणाली आहे.