TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 20 जून 2021 – कर्नाटक बँकेकडून रिलायन्स होम व रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपन्यांनी घेतलेले 160 कोटींचे कर्ज फ्रॉड आहे, असं जाहीर केलंय. त्यामुळे उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत भर पडली आहे.

आम्ही 2014 पासून रिलायन्स समूहातील या दोन कंपन्यांसोबत काम करतोय. रिलायन्स फायनान्सच्या मल्टिपल बँकिग व्यवस्थेत आमचा 0.39 टक्के तर रिलायन्स कमर्शियल फायनान्समध्ये 1.98 टक्के हिस्सा आहे.

दोन्ही कर्जांसाठी 100 टक्के तरतूद केली आहे. तसेच दोन्ही कर्जाची खाती बुडीत खाती म्हणून नोंदवली होती. त्यामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कर्नाटक बँकेकडून सांगितलं आहे.

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीला खरेदीदार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेडने रिलायन्स होम फायनान्स कंपनी खरेदी करण्यासाठी 2,887 कोटी रुपये मोजण्याची तयारी दाखविली आहे.

रिलायन्स समूहावर बँकांचे हजारो कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे हा व्यवहार पार पडला तर बँक ऑफ बडोदाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाला 2,887 कोटी रुपये मिळतील, असेही सांगितले आहे.