काय सांगता! अंबानींच्या रिलायन्सकडून दर दिवशी सव्वा तीन कोटींचे दान

मुंबई : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश असणारे, भारतातील उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मागील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये विविध सामाजिक कामांना भरभरून दान दिले असल्याचे समोर आले आहे. रिलायन्सने मागील आर्थिक वर्षात 1,184.93 कोटी रुपये सीएसआर फंडमधून खर्च केले आहेत.

कंपनीने कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान ऑक्सिजन पुरवठा, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात हा निधी खर्च केला आहे.

अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सामाजिक जबाबदारीत पुढाकार, आरोग्य आणि समाजासाठी कल्याणकारी योजना या 2021-22 मध्ये कंपनीच्या अजेंड्यावर होते. मागील आर्थिक वर्षात कंपनीने फक्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे तर देशात महासाथीत ओढावलेल्या आणीबाणीच्या प्रसंगात मोठा खर्च केला आहे.

Please follow and like us: