TOD Marathi

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण दिवसागणिक वाढत चालली आहे. रुपया कमकुवत होत असल्यानं ही भारतासाठी गंभीर बाब असल्याची चिंता अनेक अर्थतज्ञ व्यक्त करताना दिसतायत. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक नवा दावा केलाय. रुपया घसरला नसून डॉलर मजबूत होतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. ( Nirmala Sitaraman Comment On Indian Currency )

सितारामन यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेत माध्यमांशी बोलताना त्यांनी रुपयाच्या घसरणीकडे बघताना आपण कृपया कमकुवत होत आहे असा विचार न करता डॉलर मजबूत होत आहे असा अर्थ लावला पाहिजे, असा दावा केला आहे.

सितारामन यांच्या याच वक्तव्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. त्यांनी भूतकाळात केलेल्या एका वक्तव्याचा हवाला देत सितारामन यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. सुळे म्हणाल्या आहेत की, गील काही वर्षातली माझी संसदेतली भाषणं काढून बघा, मी सातत्याने महागाई आणि बेरोजगारीवर आवाज उठवते आहे. मात्र, आज मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य टीव्हीवर बघितलं. त्या असं म्हणाल्या, की “रुपया घसरत नाही, तर डॉलर मजूबत होतो,

तसेच मला त्यांना आवर्जून एक आठवण सांगायची आहे. दिवंगत सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या की ‘पैसा केवळ कागदाचा तुकडा नसतो, त्याबरोबर देशाची प्रतिष्ठादेखील जुळलेली असते. जेव्हा रुपयांचे अवमुल्यन होते, तेव्हा देशाची प्रतिष्ठाही खाली जात असते, अस म्हणत त्यांनी सितारामन यांना धारेवर धरलं आहे.