TOD Marathi

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला पत्र लिहिले आहे, त्यांच्या पत्राचा आम्ही गांभीर्याने विचार करू. (Devendra Fadnavis on Raj Thackeray letter about Andhei East election) मात्र, याच्यावर मी एकटा निर्णय घेणार नाही. मला माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करावी लागेल,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती करणारं पत्र देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं.

त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. भाजपच्या उमेदवाराला मनसेने पाठिंबा द्यावा, यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी रविवारी सकाळी राज ठाकरेंची भेट देखील घेतली होती. (Mumbai BJP President Ashish Shelar met MNS Chief Raj Thackeray on Sunday morning) यावर देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया येतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील अशा परिस्थितीत निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, अशीच आपल्या राज्याची संस्कृती आहे. असं म्हटले आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनीदेखील (NCP Chief Sharad Pawar says, Andheri east election to be done unopposed) ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

भाजपने मात्र यावर सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे ही निवडणूक खरंच बिनविरोध होणार का? हे बघावं लागणार आहे.