TOD Marathi

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आता शिंदे गटाच्या वतीने देखील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार मागे घ्यावा आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे सूर उमटु लागले आहेत. (Pratap Sarnaik writes a letter to CM Eknath Shinde about Andheri East election) शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. स्वर्गीय रमेश लटके हे आपले अत्यंत जवळचे सहकारी होते, त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना संधी देण्यात यावी आणि म्हणून ही निवडणूक बिनविरोध घेण्यात यावी, यासाठी त्यांनी हे पत्र लिहिले आहे. (Earlier Raj Thackeray, Sharad Pawar says that Andheri east election to be unopposed)

यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हीच भूमिका मांडली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. त्यामुळे राज ठाकरे, शरद पवार आणि शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीची दखल भाजप कशा पद्धतीने घेणार याची चर्चा सुरू आहे. भाजपने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे अनेक बडे नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते. भाजप कुठलीही निवडणूक गांभीर्याने घेत असते. त्याचप्रमाणे याही निवडणुकीसाठी भाजपने निश्चितच चांगलं नियोजन केलं असेलच. मात्र असं असताना भाजप आपला उमेदवार मागे घेणार का? हे पाहणं औत्सुक त्याच ठरणार आहे.