“पंजाबी असल्याचा अभिमान आहे पण आज मला तेच सांगताना लाज वाटते”

चंदीगढ  : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर आता अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला श्रद्धांजली वाहात आहेत. नुकतीच मिका सिंहनं (Mika Singh) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं  ‘स्वत:ला पंजाबी म्हणायची लाज वाटते’, असं लिहिले आहे.

मिका सिंह पोस्टमध्ये म्हणतो की, मी नेहमी म्हणतो की मला पंजाबी असल्याचा अभिमान आहे पण आज मला तेच सांगताना लाज वाटते. अवघ्या  28 वर्षांचा एक तरुण हुशार मुलगा, खूप लोकप्रिय आणि त्याच्यासमोर उज्ज्वल भविष्य असलेला  सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mika Singh (@mikasingh)

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. मी पंजाब सरकारला विनंती करतो की कृपया या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा. ‘ असं मिकानं पोस्टमध्ये लिहिलं आहे. तसेच त्यानं सिद्धूसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. फोटोला मिकानं दिलेल्या या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. सिद्धू मुसेवाला यांनी  गीतकार म्हणून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘लायसेन्स’ असे  त्यांच्या पहिल्या गाण्याचे नाव होते. हे गाणं पंजाबी गायक निंजा यांनी गायले आहे. ‘सो हाई’ या गाण्याने सिद्धू मुसेवाला यांना लोकप्रियता मिळवली. या गाण्यामुळे सिद्धू मुसेवाला यांचे नाव जगभरात ओळखले जाऊ लागले. अशाप्रकारे सिद्धू हे रातोरात स्टार झाले.

Please follow and like us: